Location, Kolhapur India
+91-98226 75750
info@avishkarfoundation.org

About Us

सप्रेम नमस्कार….

या पृथ्वीतलावर आपला जन्म झाला ते आपण कोणाचे काही तरी देणं लागतो म्हणून… समाजसेवेची आवड, इतरांना गरजेपुरती का असेना मदत करता येईल. चांगल्या आणि गुणी माणसांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकता येईल. जास्त नाही पण मनाला आनंद होईल इतके तरी इतरांचे आश्रू पुसता येईल याच भावनेने आणि उद्देशाने आविष्कार फौंडेशन, इंडिया या संस्थेची स्थापना कोल्हापूरात १ जून २००७ रोजी केली.

पत्रकार म्हणून काम करताना अनेक घटकांपर्यंत पोहचलो होतो. त्यांची गरज लक्षात येत होती. पण आर्थिक मर्यादा असल्यामुळे आपण जास्त मदत लोकांना करू शकत नाही याचा अंदाज आला. त्यामुळे जितके आर्थिक साधन असेल तेवढंच काम करायचे. उगीच कोणी सांगयत म्हणून काहीही काम करायचे नाही अशी खूनगाठ बांधली आणि कामाला लागलो. सुरूवातीच्या काळात खिसा नेहमी रिकामा असायचा. जे होते ते संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खर्च केले. जिल्हा परिषदेच्या छोट्या शाळेतील गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करायची. विधवा स्त्रीयांना स्वतःच्या पायावर उभं रहावं यासाठी मधूनच एखादे शिलाई मशिन द्यायचे. त्याचे फोटो व्हायरल करायचे. त्यामुळे गरजूंची संख्या वाढत गेली. एखाद्या शाळेत भेट दिली तिथेखडूंची कमतरता असायची मग लगेच ५०० पेक्षा जास्त शाळांना खडू वाटप केले. गरजू मुलींना सायकल दिली. पूराच्या पाण्यात संसार ज्यांचे वाहून गेले त्यांना संसार भेट म्हणून भांडी दिली, अन्नधान्य दिले. कपडे दिले. शाळेतील मुलांना वह्या, बॅग, इतर साहित्य दिलं. दहावी, बारावी परीक्षेत चांगले मार्क पाडले म्हणून २५ हजार पेक्षा जास्त मुलांना प्रमाणपत्र व बॅग वितरीत केल्या. यासाठी मात्र चाटे शिक्षण समूहाने मदत केली.

अनेक लोकांना सामावून घ्यावे या उद्देशाने संस्था विस्तारीत केली. कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत आणि भारताच्या बाहेर असा संस्थेने प्रवास केला. १९ वर्षे सातत्याने कार्य करत आहे. आज रोजी ३०० पेक्षा जास्त शाखा आणि ३५०० पेक्षा जास्त पदाधिकारी असल्याने संस्थेचा विस्तार जम्मू कश्मिर पासून तामीळनाडू पर्यंत झाला. चांगल्या माणासांचे कौतुकाचे लोन देशात नाही तर परदेशात पोहचले. प्रा. किसनराव कुराडे सरांच्या सातत्याने पाठपुरावा यामुळे संस्थेचे दुबई, थायलंड, सिंगापूर मलेशीया या ठिकाणी पुरस्काराचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पार पाडले. देशातील आणि परदेशातील १ लाख लोकांचा सन्मान करण्याचे भाग्य आविष्कार फौंडेशनला लाभले याचा आम्हाला आनंद आहे.

आज गौरवाचे आणि सन्मानची ही ज्योत अखंडपणे तेवत आहे. देशभरातून हजारो लोक या पुरस्कारांसाठी समोर येत आहेत. जानेवारी महिन्यापासूनपुरस्कार, सामाजिक कार्यातील लोकांना पुरस्कार, महिलांसाठी पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसाठी पुरस्कार, उद्योग जगतातील मान्यवरांना पुरस्कार, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार, वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार, ज्ञानज्योती पुरस्कार, कृतज्ञता समारंभ, जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन आज मान्यवरांचा सन्मान होत आहे. कृतज्ञतेची पावती म्हणून लोक मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूपात संस्थेला मदतीचा हात देतात. यातूनच संस्था आपले पुरस्काराचे सोहळे आणि सामाजिक कार्य पार पाडत आहे. या कार्यात अनेकांचे आशिर्वाद मिळाले आणि मिळत आहे. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या ओळखी झाल्या त्याचे मैत्रीत रूपांतर झाले. अनेकांना हे काम परमेश्वराचे काम वाटू लागले. सेवा देत राहणारी माणसे पुरस्कार मिळावा म्हणून कधी काम करत नाहीत. मात्र अशा गुणवंत लोकांना शोधून त्यांचा सन्मान करणे हेच आमचे ब्रिद आहे. गेल्या १९ वर्षात संस्थेकडे माजी राष्ट्रपती महामाहिम प्रतिभाताई पाटील, श्री.भैरवसिंग शेखावत, लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, भरतकुमार राऊत, संजय राऊत, विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम, न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्यासह प्रशासनातील अनेक मातब्बर मंडळी यांनी उपस्थित राहून पुरस्कार प्रदान केले आणि आपले मौलीक विचार मांडले. संजय घोडावत विद्यापीठ, नेस वाडीया कॉलेज यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेतले. हजारो शिक्षकांचा सन्मान केला. सर्पमित्र व पत्रकार मंडळी यांना मोफत विमा कवच दिले. दळवेवाडी हे पन्हाळा तालुक्यातील गाव दत्तक घेऊन तंटामुक्त घोषीत केले. हमालांचे वाचनालय उभे करून समृध्द केले. गिरगाव येथे आविष्कार वाचनालयाची निर्मिती केली. अनेक वाचनालयांना ग्रंथ प्रदान केले. कुशिरे ता. पन्हाळा येथील आश्रमशाळेला वेळोवेळी मदतीचा हात दिला. आसाम आणि जम्मू कश्मिर येथील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. असे अनेक प्रकारचे कार्य केले आणि आजही सुरू आहे.

भविष्यातील प्रकल्प शिक्षण, समाजसेवा याबरोबर संस्था भविष्यात ‘ आविष्कार वृध्द सेवा आश्रम’ निर्माण करून निराधार वृध्दांना प्रेमाने संभाळ करण्याचे ठिकाण निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. एखाद्या व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत आनंद ठेवता येते का हे पाहणे खुपच गरजेचे आहे. यासाठी वृध्द सेवा आश्रमाची निर्मिती भविष्यात करणेचा मानस आहे

शेवटच्या श्वासापर्यंत आनंद ठेवता येते का हे पाहणे खुपच गरजेचे आहे. यासाठी वृध्द सेवा आश्रमाची निर्मिती भविष्यात करणेचा मानस आहे.

कौतुकाची आणि गुणी माणासांची ही माळ अशीच बांधली जाईल. ती माळ मजबूत होईल या दृष्टीने संस्था व त्यातील सर्व पदाधिकारी, हितचिंतक कार्यरत राहतील एवढीच अपेक्षा..!

श्री. संजय पवार (पत्रकार) संस्थापक अध्यक्ष, कोल्हापूर